थोरातांचा भाजपसोबत शिवसेनेला टोला; तरी म्हणतात, 'सरकार स्थिर'!

टीम ई-सकाळ
Sunday, 17 January 2021

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा सामना सुरू केला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राज्यभरात घोंगावत आहे. त्यावरू सत्ताधारी, विरोधक आणि नामांतराला विरोध करणारे आपापल्या भूमिका जाहीर करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'सामना'मधून केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

कात्रज परिसरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे घडली दुर्घटना?​

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून थोरात यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, 'औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?'

पुणे- मुंबई महामार्गावर ट्रेलर जळल्याचा थरार; चालकाच्या प्रसंगावधान मोठा अपघात टळला​

शिवसेनेला मतांची चिंता वाटते
राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा सामना सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, असा चिमटाही थोरात यांनी सेना-भाजपला काढला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक घाव अन् दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न लागला मार्गी​

आमचे सरकार स्थिर
महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल, अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसांच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे. खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणही थोरात यांनी दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Balasaheb Thorat attacks Shivsena and BJP over Aurangabad rename issue