भाजपवाल्यांनो सावधान! काँग्रेसचा चाणक्य येतोय...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यात रोज वेगवेगळी वळणं येत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदरांवर लक्ष ठेवण्यासाठी आता काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे डी. के. शिवकुमार आता या सत्तानाट्यात उतरत आहेत.

मंबई : महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यात रोज वेगवेगळी वळणं येत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदरांवर लक्ष ठेवण्यासाठी आता काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे डी. के. शिवकुमार आता या सत्तानाट्यात उतरत आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणात आमदार फोडाफोडीचं पीक आलंय. अशातच काही धोरणं अवलंबण्यासाठी व आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटकचे आमदार व काँग्रेसचे महत्त्वाचे नेते डी. के. शिवकुमार आज (ता. 25) मुंबईत येत आहेत. 

भाजपवर मात करणारा नेता काँग्रेसमध्ये आहे! हा बघा..!

कोण आहेत शिवकुमार?
अडचणीच्या काळात काँग्रेससाठी धावून येणारे नेते म्हणून कर्नाटकमधील डी. के. शिवकुमार यांचा उल्लेख केला जातो. जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये बंडखोरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा काँग्रेसने ते प्रकरम हाताळण्यासाठी डी. के. शिवकुमार यांना पाचारण केले आहे. 2002मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख सरकार अडचणीत आल्यानंतर शिवकुमार यांनी ते प्रकरण हाताळले होते. कर्नाटकातील वोक्कलिंग समाजाचे नेते म्हणून, परिचित शिवकुमार गांधी घराण्याशी एकनिष्ठ मानले जातात.

विलासरावांचे सरकार वाचविणारे शिवकुमार आता काँग्रेसला तारतील?

2017मध्ये अहमद पटेल यांच्या राज्यसभेच्या निवडीवेळी गुजरातमधील आमदार फुटण्याची शक्यता होती. त्यावेळीही शिवकुमार काँग्रेसच्या मदतीला धावून आले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला 79 आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला 37 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 112 जागांची गरज असताना भाजपच्या हातून सत्तेचा घास हिसकावून घेण्यात शिवकुमार यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये 13 काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे वास्तव्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये होते. तेथे शिवकुमार यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. हॉटेलबाहेर शिवकुमार यांनी आंदोलन केल्यानं ते पुन्हा चर्चेत आले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दरम्यान, फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून आमचे सर्व आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 30 तारखेला होणारी बहुमत चाचणीही यशस्वी होण्याचा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप 30 तारखेला बहुमत सिद्ध करणार की सरकार कोसळणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader D K Shivkumar will come to the Maharashtra to control Congress MLA