'त्यांनी' आमचा विश्वासघात केलाय, सत्यजीत तांबेंबाबत हायकमांड लवकरच निर्णय घेईल - नाना पटोले

भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केला असून त्याची फळं भाजप (BJP) भोगत आहे.
Nana Patole News
Nana Patole Newsesakal
Summary

नाशिकमध्ये डाॅ. सुधीर तांबेंनी आमचा विश्वासघात केला, या वक्तव्यावर मी ठाम आहे.

Nana Patole News : भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केला असून त्याची फळं भाजप (BJP) भोगत आहे. भाजप दुसऱ्याची घरं फोडतं, त्याचा आनंद साजरा करत आहे, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, अमरावती-नागपुरात भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली. नाशिकमध्ये आमचं घर फोडलं, आमचा एक नेता फोडला. मात्र, यापुढं आता भाजपची 50 नेते फोडू, असा दावा त्यांनी केला.

Nana Patole News
Ajit Pawar : प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'बाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही एकत्र लढलो तर..

सत्यजीत तांबेंबाबत (Satyajeet Tambe) विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, तांबेंचा जो काही निर्णय असेल तो हायकमांड घेईल. पक्षानं सांगितलं असतं तर आम्ही त्यांना तिकीट दिलं असतं, पण असा कोणताच आदेश आम्हाला नव्हता. नाशिकमध्ये डाॅ. सुधीर तांबेंनी आमचा विश्वासघात केला, या वक्तव्यावर मी ठाम आहे. त्यांनी सांगितलं असतं सत्यजीत तांबेंना तिकीट द्या तर आम्ही दिली असती. मात्र, इथं आमचा विश्वासघात झाला. या सगळ्या गोष्टी भाजपनं घडवून आणल्या आहेत. याचे परिणाम भाजपला भविष्यात भोगावे लागतील, असा त्यांनी इशारा दिला.

Nana Patole News
Udayanraje Bhosale : देशाला सशक्त, समृद्ध करणारा 'अर्थसंकल्प'; उदयनराजेंची प्रतिक्रिया आली समोर

नागपूर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांचा विजय झाला. यावरही पटोलेंनी प्रतिक्रिया दिली. विदर्भ हा पहिल्यापासून काँग्रेसचाच गड राहिलेला आहे. मात्र, चुकीच्या समन्वयामुळं आम्ही मागे पडत गेलो. यावेळी काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी हे युद्ध एकदिलाने लढवले. खासदार राहुल गांधी पदयात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या यात्रेला मराठवाडा, विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेमुळं लोकांमध्ये काँग्रेसबाबत उत्साह निर्माण झालेला, त्यामुळंच हा विजय साकारता आला, असंही पटोले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com