Vidhan Sabha 2019 : विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

टीम ई-सकाळ
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज (गुरुवार) आपले अर्ज दाखल केले.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज (गुरुवार) आपले अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी काल (बुधवार) जाहीर झाली. यामध्ये राज्यातील 52 विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देण्यात आले. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित यांना लातूर शहर तर धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Vidhan Sabha 2019 : महाडमधून आघाडीचे उमेदवार माणिक जगतापांचा अर्ज

त्यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी दाखल केला. वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Vidhan Sabha 2019 : चंदगडला बाभूळकर गटाकडून 'यांना' उमेदवारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Vijay Wadettiwar file nomination form from Brahmapuri