

Jitesh Antapurkar Resigns: महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवारी) रात्री भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विधिमंडळानेही राजीनामा स्वीकारत गॅजेट काढून घेतले आहे.