राजकीय पर्यटनावरून काँग्रेसचे आमदार राज्यात परतणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राज्यातील सत्ता स्थापनेच्या कुस्तीत आपले मल्ल शाबूत राहावे, त्यांची कसरत योग्य व्हावी, त्यांनी दुसऱ्या उस्तादांचा तंबू गाठू नये म्हणून काँगेसने स्वतःचा आखाडा असलेल्या काँग्रेसशाशीत राजस्थानमध्ये आमदारांना नेले.

पुणे : राज्यातील सत्तानाट्याचा महत्वाचा अंक राजस्थानमध्ये घडला. सत्तास्थापनेसाठी राजकीय पर्यटनाला जयपूरमध्ये गेलेले काँग्रेस आमदार आज (ता.१३) परतणार आहे. मागील चार दिवसांपासून जयपूर मधील ब्युना विस्टा रिसॉर्टमध्ये थांबलेले आमदार दुपारी साडेबारा वाजता चार्टड प्लॅनने मुंबईला परतणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील सत्ता स्थापनेच्या कुस्तीत आपले मल्ल शाबूत राहावे, त्यांची कसरत योग्य व्हावी, त्यांनी दुसऱ्या उस्तादांचा तंबू गाठू नये म्हणून काँगेसने स्वतःचा आखाडा असलेल्या काँग्रेसशाशीत राजस्थानमध्ये आमदारांना नेले. असे असतानाही त्यापैकी काही आमदारांची पुढील भूमिका संदिग्ध दिसत आहे.

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे

त्यांचे राजकीय पर्यटन किती सफल झाले. हे राज्यात परतल्यानंतरच कळेल. जयपूर मधून काँग्रेस आमदार तूर्तास परतल्यामुळे सत्तास्थापनेतून आघाडीने माघार घेतली का काय? असा प्रश्न पडतो.

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLAs return in Maharashtra form Jaipur