

Sharad Pawar
esakal
Delimitation Bill NDA Support INDIA Meeting
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपप्रणीत एनडीएला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट होत आहे. शुक्रवारी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. पक्षाकडून अद्यापही याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी काँग्रेसने मात्र शरद पवारांसह त्यांच्या पक्षावर कडाडून टीका केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवारांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जोपासला. परंतु त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेसाठी बनला असून त्याशिवाय त्यांना जगणं मान्य नाही.