मोदी सरकार देशवासियांना बनवतेय भिक्षेकरी, नाना पटोलेंचा आरोप

nana patole
nana patole esakal

अमरावती : देशातील कोरोनाची (corona situation in india) परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार (modi government) पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत (second wave of corona) देशात सर्वाधिक मृत्यू झालेत. अनेकांचे रोजगार गेलेत. व्यवसाय बंद पडलेत. अनेकांनी कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली. एकूणच मोदी सरकार देशवासींना भिक्षेला लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (congress state president nana patole) यांनी आज केला. (congress state president nana patole criticized pm modi in amravati)

nana patole
रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, नागपुरातील तब्बल १३ गावांनी करून दाखविले

जिल्हा दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १२) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाची दुसरी लाट येणार याची शास्त्रज्ञांनी कल्पना दिल्यानंतरही मोदी सरकार गाफील राहिले. देशात मृत्यूने कहर केला. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतासुद्धा देशात ऑक्सिजन, लशींबाबत केलेले नियोजन फसले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेतसुद्धा मोदी सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीत, असेही ते म्हणाले. महामारीमुक्त देश हीच काँग्रेसची संकल्पना असून त्यादृष्टीने प्रत्यक्षात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करीत असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, महिला व बालकल्याण विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

पीकविमा म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा -

पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अटी केंद्र शासनानेच बदलल्या आहेत. अनेक अटी आज गैरलागू आहेत. असे असतानाही महाविकास आघाडीच्या नावाने खडे फोडण्याचा उद्योग भाजप नेते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com