Rashmi Shukla: महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक; रश्मी शुक्लांच्या नियुक्तीची अखेर घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं याची सध्या चर्चा सुरु आहे.
Rashmi Shukla
Rashmi ShuklaEsakal

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. (Controversial IPS officer Rashmi Shukla appointed as Maharashtra Director General of Police)

पुण्यात आणि मुंबईत एफआयआर

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर होती, त्यामुळं त्यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. (Latest Marathi News)

Rashmi Shukla
Sanjay Raut: "आता फक्त एकच राहिलंय, भाजपकडून श्रीरामालाच उमेदवारी दिली जाईल"; संजय राऊतांचा खोचक टोला

'या' नेत्यांचे झाले होतो फोन टॅप

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही FIR नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. (Marathi Tajya Batmya)

Rashmi Shukla
Sanjog Waghere: अजितदादांचा विश्वासूच देणार पार्थ पवारांना आव्हान! ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्याची तयारी?

क्लोजर रिपोर्ट

दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com