‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी ब्राझीलचे मुंबईतील महावाणिज्य दूत जोसे माऊरो यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा सारांश..भारत आणि ब्राझील यांच्या आर्थिक विकासाची आणि द्वीपक्षीय संबंधांची चर्चा करत असताना, कोणत्या प्रमुख क्षेत्रांत आपण सहकार्य करू शकतो ?माऊरो - गेल्या ८० वर्षांत भारत आणि ब्राझील या दोघांनीही आपापल्या अडचणींवर, समस्यांवर चांगले उपाय शोधले आहेत. त्यामुळे यात आपण एकमेकांना भरपूर काही देऊ शकतो. सध्या उत्तरेकडील प्रदेशांमधील अनिश्चितेमधून आपल्याला थोड्याबहुत सवलतीही मिळत आहेत. त्याचबरोबर काही देश आपल्यावर दडपणदेखील आणत आहेत. पण आपण कोणावरही दडपण आणत नाही. अशा परिस्थितीत आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी एकमेकांच्या जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कृषी, उद्योग, संरक्षण क्षेत्रांत सहकार्य होत आहे..द्वीपक्षीय संबंधांचा विचार करता २०३० पर्यंत ते सुधारण्यासाठी कोणत्या दोन-तीन प्रमुख क्षेत्रात भारत आणि ब्राझील वेगाने एकत्रित काम करू शकतात?गेली काही दशके भारत ज्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करत आहे, त्यात आम्हाला विशेष रस आहे. औषधनिर्मिती, इंटरनेट तंत्रज्ञान आणि दूरसंचार ही ती प्रमुख क्षेत्रे आहेत. त्याचप्रमाणे कृषिऊर्जा आणि अभियांत्रिकी या विभागात सहकार्य केल्यास तुमचाही मोठा फायदा होईल. कृषीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल कृषी अर्थव्यवस्था या क्षेत्रांचाही भारत मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. जगाला सेवा देणारी डेटा सेंटर आम्ही ब्राझीलमध्ये उभारणार आहोत..सध्या भारत हे जगाचे औषध निर्मिती उत्पादन केंद्र झाले आहे. अशा स्थितीत ब्राझीलच्या औषधनिर्मिती क्षेत्रासाठी भारत कशी मदत करू शकतो ?आम्हाला लशींच्या उत्पादनातील क्षमता वाढवायची आहे. उदा. आज बहुसंख्य कर्करोग रुग्णांचे निदान तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातच होते; मात्र मुंबईतील एक कंपनी रक्तातील कर्करोग फार लवकर ओळखते. अशा उपाययोजनांचे आम्ही स्वागत करू..जैवइंधन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये ब्राझीलचा वरचष्मा आहे. ही क्षेत्रे भारतातही वाढत असल्याने त्याचा मुंबई-महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो ?आम्ही वाहन इंधनासाठी अल्कोहोल-इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेतला. या इंधनाचे प्रदूषण पेट्रोलपेक्षा ९३ टक्के कमी असते. तुम्हीही मोटारींमध्ये बदल न करता १०० टक्के अल्कोहोल-इथेनॉल इंधन वापरू शकता. पेट्रोलियम पदार्थांसाठी भारत परदेशांवर अवलंबून असताना यात ब्राझील भारताला मदत करू शकतो. भारतीय किनारपट्टीवर कच्च्या तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठीही ब्राझील भारताला मदत करू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.