esakal | कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींनाही आर्थिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Dahihandi

दहीहंडी उत्सव म्हटले की, कलाकारांना एका दिवसामध्ये लाखो रुपयांची कमाई करण्याची सुवर्णसंधी. मात्र, यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार नाही. त्यामुळे सेलिब्रिटींच्या लाखो रुपयांच्या सुपारीवर पाणी पडले आहे. उत्सवात मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. त्यासाठी मोठ्या सेलिब्रेटींपासून छोट्या कलाकारांना आमंत्रित केले जाते.  शिवाय एकाच दिवशी ते चार ते पाच मंडळांना भेटी देतात.

कोरोनामुळे दहीहंडी उत्सव रद्द; सेलिब्रिटींनाही आर्थिक फटका

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई - दहीहंडी उत्सव म्हटले की, कलाकारांना एका दिवसामध्ये लाखो रुपयांची कमाई करण्याची सुवर्णसंधी. मात्र, यंदा कोरोनामुळे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार नाही. त्यामुळे सेलिब्रिटींच्या लाखो रुपयांच्या सुपारीवर पाणी पडले आहे. उत्सवात मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. त्यासाठी मोठ्या सेलिब्रेटींपासून छोट्या कलाकारांना आमंत्रित केले जाते.  शिवाय एकाच दिवशी ते चार ते पाच मंडळांना भेटी देतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळपासूनच त्याची सुरुवात होते. केवळ भेट देऊन हात दाखविणे, एखादे गाणे म्हणणे किंवा डान्स करणे याप्रमाणे मानधन आकारले जाते. यामुळे कलाकारांची चांगली कमाई होते. केवळ मुंबईतच नव्हे तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर येथेही सेलिब्रेटी विविध उत्सवांना हजेरी लावीत असतात. उलट मुंबईपेक्षा अन्य ठिकाणी सेलिब्रेटींना मागणी जास्त असते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच ठप्प असल्याने कलाकारांना याचा फटका बसणार आहे. 

सरकारने घेतलेला निर्णय आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र, आम्हाला याचा आर्थिक फटका बसलेला आहे. दरवर्षी मी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावते; परंतु यंदा या उत्सवाला मी मुकणार आहे. 
- नम्रता गायकवाड, अभिनेत्री.

गेल्या वर्षीदेखील कोल्हापूर, सांगली येथे महापूर आल्यामुळे दहीहंडी उत्सव म्हणावा तसा साजरा करता आला नाही. आत्ताची परिस्थिती निराळी आहे. सगळ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे आर्थिक फायदा किंवा तोटा हे पाहण्यापेक्षा सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून पुढील दहीहंडीची वाट पाहणेच योग्य. 
- दीप्ती धोत्रे, अभिनेत्री.

Edited By - Prashant Patil