अलिबाग : पर्यटनाला दिलेली सूट महागात, पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवर

Corona-patient
Corona-patientSakal media

अलिबाग : नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पर्यटन व्यवसायाला (tourism business relief) दिलेली सूट रायगड (Raigad) जिल्ह्यात महागात पडत आहे. मागील १५ दिवसांतील जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे एक हजार नव्या रुग्णांची (corona new patients increases) पडलेली भर ही बाब अधोरेखित करते. सध्या दररोज ३०० नवीन रुग्णांची वाढ होत आहे. १५ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी (corona positivity rate) दर २.४७ वरून २०.३१ टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्हा आरोग्य विभागासाठी ही डोकेदुखी ठरली आहे. (corona new patients increases speedily in raigad district positivity rate on twenty percent)

Corona-patient
मुंबई पोलिसांनी चार पिस्तुलांसह जप्त केली जिवंत काडतुसं; एकाला अटक

नाताळच्या दरम्यान २६ डिसेंबरला करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये २.४७ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्क लावणे, हात निर्जंतुक करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.‌ किरण पाटील यांनी केले होते. आता जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागले आहेत. २१ डिसेंबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

ही आकडेवारी चिंताजनक असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर दररोज १०० पेक्षा कमी रुग्ण सापडत होते. ती संख्या सध्या ३०० पर्यंत पोहचली आहे; तर १५ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.४७ वरून २०.३१ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारने सुचविलेल्या सूचना तसेच निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Corona-patient
‘नैना’प्रकल्प रद्द करा अन्यथा आत्‍मदहन करू, शेतकऱ्यांचा इशारा

"३ जानेवारीपासून सरकारने १५ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हाती घेतले आहे. त्यामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह १८ वर्षांवरील ज्या नागरिकांनी लशीची मात्रा घेतली नाही त्यांनी त्वरित घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरणाबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीही करणे तितकेच महत्त्वाचे आहे."

- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

"एखाद्या शाळेत बाधित रुग्ण आढळल्यास त्या शाळेचे वर्ग बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. रायगड जिल्ह्यात अद्याप एकही शाळा कोरोनामुळे बंद करण्यात आलेली नाही."

- ज्योत्स्ना शिंदे-पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com