esakal | लसीकरणाविनाच एसटी कर्मचारी कर्तव्यावर; प्रशासनाचा निष्काळजीपणा
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

लसीकरणाविनाच एसटी कर्मचारी कर्तव्यावर; प्रशासनाचा निष्काळजीपणा

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोना महामारीनंतर (Corona pandemic) आता गौरी, गणपती उत्सवाच्या हंगामासाठी (Ganpati Festival) एसटी कर्मचारी (ST employees) आपले जीवाचे रान करत आहे. स्वतःच्या घरच्या गणपती उत्सवात हजर न राहता प्रवाशांना (commuters) त्यांच्या उत्सवासाठी आपल्या घरी सुरक्षित पोहचवण्यासाठी एसटी कर्मचारी चोवीस तास कामावर आहे. मात्र, अद्याप राज्यभरातील 98 हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण (corona vaccination) करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून, विना लसीकरण एसटी कर्मचारी आपला जीव मुठीत (life risk) धरून कर्तव्य बजावत आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 354 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

कोरोना महामारीनंतर अत्यावश्यक सेवेत 9 सप्टेंबर पर्यंत तब्बल 305 एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोना महामारीची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर 9008 कर्मचारी आतापर्यंत कोरोना बाधित झाले आहे. त्यापैकी 8651 कर्मचारी बरे होऊन आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहे. तर अद्याप 52 कर्मचारी कोरोनाचा उपचार घेत आहे. मात्र, यामध्ये सर्वाधिक महत्वाचं म्हणजे 98 हजार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फक्त 62 हजार 983 कर्मचार्यांचेच आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.

नुकतेच, राज्य सरकारनेही प्रवासी सेवा देणाऱ्या चालकांना लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तब्बल 50 टक्के कर्मचारी अद्याप लसीकरणापासून वंचीत असून, गौरी, गणपती हंगामानंतर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: अकरावी तिसरी गुणवत्ता यादी; अजूनही 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी

लसीकरणावर भर देण्याची गरज

एसटी महामंडळात 305 एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही महामंडळ प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी गंभीर नाही. त्यामुळे भविष्यात आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा लसीकरणावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

"एसटी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे गांभीर्य नाही. 305 कर्मचारी कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे. आणखी किती कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने महामंडळाला पहायचे आहे ? त्यामुळे अशा मुर्दाड प्रशासनाचा निषेध करतो."

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी कर्मचारी काँग्रेस

"सरकारला कोरोना काळात सर्वात जास्त उपयोग तर एसटी कामगारांचाच झाला, हजारो मजूर सिमेवर सोडले, दिड वर्ष बेस्ट उपक्रमात चार हजार एस टी कामगारांनी काम केले सुमारे 305 कर्मचा-यांनी कोरोनामध्ये बलिदान दिले पण सरकारच्या लेखी नेमकं आमचं स्थान कोणतं तेच कळत नाही. इतरांना फ्रंट वॅारीयर दर्जा देऊन प्रथम लसीकरण पण एस टी कामगारच सर्वात मागे ? मग अजुन आम्ही किती बळी द्यायचे ?"

- संदीप शिंदे, अद्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

loading image
go to top