औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा झपाटा | Corona In Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid19

औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना रूग्णसंख्या वाढीचा झपाटा

पुणे : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये जानेवारीत कोविड-१९ पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांहून अधिक झाला असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. औरंगाबाद (Auranabad), अकोला (Akola), नांदेड (Nanded) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा १० जानेवारीला सादर केला. या आढाव्यानुसार, २६ डिसेंबर ते एक जानेवारी (Corona Positivity Rate In Maharashtra) या आठवड्याच्या तुलनेत दोन जानेवारी ते आठ जानेवारी या काळात चार ही जिल्ह्यांमध्ये कोविड १९ चा पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. औरंगाबादमध्ये १२.४५ पट, अकोल्यात १३.३८ पट, नांदेडमध्ये ११.७६ पट आणि वर्ध्यामध्ये १३.७५ पट कोविड१९ चा पॉझिटिव्हिटी दर वाढला. चाचण्यांच्या तुलनेत किती रूग्ण कोविड १९ बाधित होतात. (Corona Positivity Rate High In Aurangabad, Nanded, Wardha And Akola Of Maharashtra State)

हेही वाचा: Corona Precaution : कोरोना, ओमिक्रॉनला घाबरू नका; अशी घ्या काळजी...

यावरून रूग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर ठरविला जातो. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या रूग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यात चाचण्यांची संख्या दीडपटीने वाढली आहे. मुंबईमध्ये दोन ते आठ जानेवारीअखेर साडेतीन लाख, तर पुण्यामध्ये सुमारे दीड लाख चाचण्या झाल्या.देशामध्ये शंभर जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांदरम्यान आहे. त्यामध्ये केरळात सर्वाधिक बारा जिल्हे आहेत. त्याखालोखाल झारखंडमध्ये नऊ आणि महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडूत प्रत्येकी आठ जिल्हे आहेत. दहा टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर असलेले ९१ जिल्हे देशात आहेत. त्यातील सर्वाधिक पंधरा जिल्हे पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्र, मिझोराममध्ये प्रत्येकी नऊ जिल्हे आहेत.

हेही वाचा: Omicron: मेडिकल काॅलेजच्या 56 विद्यार्थिनींना ओमिक्रॉनची लागण

लसीकरणाची स्थिती (नऊ जानेवारीअखेर)

१५१.५७ कोटी एकूण लसीकरण

८६.०८ कोटी लसीचा पहिला डोस

६३.२० कोटी लसीचा दुसरा डोस

पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील लसीकरण

७.४० कोटी एकूण लोकसंख्या

३ जानेवारीपासून लसीकरण सुरू

२.२९ कोटी (३१ टक्के) मुला-मुलींना पहिला डोस

येत्या काळात...

४,१४,१८८ रूग्णसंख्या चार मे २०२१ रोजी

१,१२,१२० सरासरी रूग्णसंख्या १० जानेवारी २०२२ रोजी

२८ पट रूग्णसंख्या चौदा दिवसांत वाढली

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top