
Corona Update : राज्यात आज 1111 कोरोना रूग्ण, तर 1474 रुग्ण बरे
मुंबई : महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 1111 नव्या रुग्णांची भर पडली असून दिवसभरात एकूण 1474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए.5 व्हेरीयंचे 26 रुग्ण आढळले आहेत. तर बीए. 2.75 चे 13 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान आज देखील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 176 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15162 इतकी झाली आहे. यातच राज्यात एकाही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही, आज शून्य कोरोनाबाधित मृत्युची नोंद झालीय. त्यामुळे राज्यात मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,57,314 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.
हेही वाचा: "हा तर कॉमेडी एक्सप्रेस सिझन-2"; शिंदे गटाच्या कार्यकारिणीची राऊतांकडून खिल्ली
बीए.5 आणि बीए.2.75 व्हेरिएंटच्या एकूण आढळलेल्या रुग्णांपैकी 23 रुग्ण हे मुंबईतील आङेत, तर 13 रुग्ण हे पुण्यातील आहेत, तर बुलढाणा, लातूर आणि ठाणे या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात बीए.4 आणि बाए.5 व्हेरिएंट 158 तर बीए.2.75 व्हेरिएंटचे 70 रुग्ण झाले आहेत.
हेही वाचा: शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर फूट! उद्या शिक्कामोर्तब होणार?
Web Title: Corona Update 1111 New Cases Reported In State 1474 Recoveries In The Last 24 Hours
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..