"हा तर कॉमेडी एक्सप्रेस सिझन-2"; शिंदे गटाच्या कार्यकारिणीची राऊतांकडून खिल्ली

Shivsena sanjay raut on eknath shinde new  shivsena national executive committee political news
Shivsena sanjay raut on eknath shinde new shivsena national executive committee political news Sakal

दिल्ली : शिंदे गटाने आझ नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. हे खासदार शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी सध्या सुरु असलेला हा प्रकार कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ असल्याचे म्हटले आहे. (Sanjay Raut On Shivsena)

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत प्रतिक्रीया दिली, ते म्हणाले की, माध्यमात दाखवण्यात आलं हा प्रकार कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ असून, कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ हे विधीमंडळात झाला आहे. ज्यावर २० तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठापुढे फुटीर गटाच्या भवितव्यासंदर्भाचा निर्णय लागेल.

ते पुढे म्हणाल की, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत असलेली याचिका कायद्याच्या नियमांच्या आधारावर पक्की आहे, त्यामुळे न्याय आम्हाला मिळेल असेही राऊत म्हणाले. याच भीतीने फुटीर गटाने कार्यकारिणी जाहिर केली असल्याचे ते म्हणाले. एक गट राष्ट्रीय कार्यकारणी कशी बदलू शकतो असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही ते शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो यावर लोक हसत आहेत, म्हणून हे कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Shivsena sanjay raut on eknath shinde new  shivsena national executive committee political news
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, सर्वच प्रमुख विरोधी पक्षात फूट

स्वतःची कतडी वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे, जे सोडून गेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कमपणे उभी आहे. शिवसेनेचं नेतेमंडळ हे बाळासाहेब ठाकरे यांनी आणि कार्यकारिणीने निर्माण केले आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून नेमण्यात आलेले असतात शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. हा गट नाहीये, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. अनेकांनी फूटून पक्ष निर्माण केले असतील त्यांना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार कायद्याने अथवा इतर नियमाने नाही, त्याचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे संजय राऊत म्हणाले, यावेळी शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याचे देखील राऊत म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी , संजय जाधव हे उपस्थित होते, तर ओमराजे निंबाळकर तसेच अजून काही खासदार वाटेत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

Shivsena sanjay raut on eknath shinde new  shivsena national executive committee political news
ठाकरेंना दणका : शिदेंकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com