esakal | Corona Update: राज्यात 3,063 नव्या रुग्णांची नोंद, 56 मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यात 3,063 नव्या रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात आज 3,063 नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,50,856 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 3,198 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

हेही वाचा: बंडाच्या तयारीत असलेल्या काँग्रेसजनांना शांत करण्यासाठी लवकरच बैठक

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,71,728 इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून 97.27 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 56 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 1,39,067 इतका झाला आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 36,484 इतकी आहे.

हेही वाचा: संतापजनक! इबोला संकटात मदतीला गेलेल्या WHO कर्मचाऱ्यांनी केले बलात्कार

नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 11, नाशिक 24, पुणे 9, कोल्हापूर 6, लातूरमध्ये 6 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,45,427 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,423 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top