राज्यात नवीन रुग्णांमध्ये सात हजारांची घट; रिकव्हरी रेटही वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan corona Update
राज्यात नवीन रुग्णांमध्ये सात हजारांची घट; रिकव्हरी रेटही वाढला

राज्यात नवीन रुग्णांमध्ये सात हजारांची घट; रिकव्हरी रेटही वाढला

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 15,140  नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 35,453 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 95.42 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचा आकडा कालच्या तुलनेत आणखी कमी झाला. (corona update maharashtra daily corona news)

हेही वाचा: Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण संख्या 77,21,109 झाली आहे. राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ही रुग्णांची संख्या 73,67,259 वर पोहोचली आहे. तर 39 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. यामुळं मृतांचा एकूण आकडा 1,42,611 इतका झाला आहे.

हेही वाचा: Video : असा मिळाला आंदोलक विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा घरचा पत्ता

दरम्यान, राज्यातील मृत्यूदर 1.85 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यातील औरंगाबाद, नागपूर मंडळांमध्ये मृत्यूंची नोंद झाली नाही. ठाणे 26, नाशिक 2, पुणे 6, कोल्हापूर 2, लातूर 2, अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले आहेत. 

हेही वाचा: विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवण्यामागं षडयंत्र असल्याचा संशय - गृहमंत्री

सध्या राज्यात 11,74,825 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 2,07,350 इतकी झाली आहे.

Web Title: Corona Update Maharashtra Daily Corona News Aau85

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top