esakal | राज्यात दिवसभरात 8 हजार 172 नवे रुग्ण; आतापर्यंत 3 कोटी जणांना लस
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

राज्यात काही जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काही जिल्ह्यातील वाढ चिंताजनक अशीच आहे.

राज्यात दिवसभरात 8 हजार 172 नवे रुग्ण; आतापर्यंत 3 कोटी जणांना लस

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. राज्यात काही जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी काही जिल्ह्यातील वाढ चिंताजनक अशीच आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात 8 हजार 172 नवे रुग्ण आढळले. तर 8 हजार 950 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 56 लाख 74 हजार 594 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले. सध्या राज्यात एकूण 1 लाख 429 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.28% इतके झाले आहे.

पुणे शहरात 321 तर पिंपरी चिंचवडमध्ये 243 नवे रुग्ण

पुण्यात शनिवारी दिवसभरात 321 नवे रुग्ण आढळले तर 432 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 83 हजार 520 इतकी झाली आहे. तर 4 लाख 71 हजार 909 जणा कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2926 जणांवर उपचार सुरु असून गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात 243 नवे रुग्ण आढलळे असून 229 जण कोरोनामुक्त झाले. शनिवारी 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 188 जणांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना

मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.07 टक्के

मुंबईत गेल्या 24 तासात 466 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 806 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत मुंबईत 7 लाख 6 हजार 40 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 6 हजार 618 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 10 ते 16 जुलै या कालावधीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.07 टक्के इतका असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

राज्यात 3 कोटी जणांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

loading image