esakal | Corona Update: राज्याचा मृत्युदर 2.04 % वर; आज 8,296 नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update: राज्याचा मृत्युदर 2.04 % वर; आज 8,296 नवे रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्यभरात नियंत्रणात आलेला मृत्यूचा 'बॅकलॉग' पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसात हजार अतिरिक्त मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मृत्युदर ही वाढला असून तो 2.03 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: मनाली: मास्क नसेल तर पाच हजारांचा दंड आणि 8 दिवस तुरुंगवास

सोमवारी राज्यात केवळ 51 मृत्यूंची नोंद झाली. त्यांपैकी 44 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 7 मृत्यू हे मागील आठवडयातील होते. या दरम्यान एकही जुना अतिरिक्त मृत्यू बाकी नव्हता. मृतांचा एकूण आकडा 1,23,136 इतका होता. गेल्या दोन दिवसांपासून मात्र अतिरिक्त मृत्यू वाढले आहेत. राज्यात शुक्रवारी 121 रुग्ण दगावले.मात्र त्यांपैकी एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीच्या 318 मृत्यूची नोंद कोविड पोर्टलवर करण्यात आली त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,24,296 वर पोहोचला.

हेही वाचा: 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

राज्यात शनिवारी 200 मृत्यू झाले. मात्र त्यासह जुन्या 538 मृत्यूंची नोंद देखील करण्यात आली. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,25,034 इतका झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसात राज्यात 1,177 मृत्यूंची भर पडली. त्यात 856 जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश होता. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर उशिराने अद्ययावत होत आहेत. जुन्या अतिरिक्त मृत्यूंचा समावेश त्या त्या वेळी राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या वाढली आहे असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

loading image