प्रशासकीय अधिकारी असलेल्या तांबे दांपत्याकडून गावची 'सेवा'!

Amol Tambe And Archana Tambe
Amol Tambe And Archana Tambe

शिरूर (पुणे): गावाबाहेर राहून राज्याची सेवा करत असताना, आपल्या गावातील नागरिक सुद्धा सुरक्षित राहावेत. या भावनेतून गावातील प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गणेगाव (खालसा) या गावचे सुपुत्र व नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे व त्यांच्या पत्नी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे या प्रयत्न करत आहेत. गावातील प्रत्येकासाठी त्यांनी होमिओपॅथी औषध पाठवले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्यावर निर्बंध घालण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. 'अयुष' मंत्रालय - भारत सरकार यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी होमिओपॅथीचे 'Arsenic Album 30' हे औषध रोगप्रतिबंधक उपचार म्हणून घेण्यासाठी सुचविले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोविड- 19 या आजाराची लागण होण्याची शक्यता कमी असते. एक वर्षाच्या वयापुढील सर्वजण हे औषध घेऊ शकतात.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये तांबे दांपत्याने अहोरात्र काम केले करत आहे. त्यांच्या कामाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, ट्विटरवरून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गावातील गरीब नागरिकांना किमान दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्याचे वाटप अमोल तांबे यांचे वडील श्रीधर व बंधू महेश तांबे यांनी केले आहे. शिवाय, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम बांधवांना सुका मेवा भेट म्हणन दिले आहे.

गणेगावची लोकसंख्या अडीच हजार एवढी आहे. गावातील प्रत्येकासाठी होमिओपॅथीचे औषध म्हणून अमोल व अर्चना तांबे यांनी नाशिक येथून पाठवून दिले आहे. यासाठी नाशिकचे डॉ. अशर शेख यांनी मदत केली. गावचे सरपंच दत्ता पिंगळे यांच्या ताब्यात औषध देण्यात आले. ग्रामपंचातीच्या वतीने नागरिकांना औषध दिले जात आहे. शिवाय, गावातील युवकांचा एक गट तयार करून प्रत्येकाच्या घरी जाऊन औषध दिले जात आहे. राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांना औषधे दिली जातात. पण, एखाद्या गावामधील शंभर टक्के नागरिकांना औषध दिल्याची ही पहिलीच घटना आहे.

अमोल तांबे म्हणाले, 'गावापासून दूर असलो तरी गावची नाळ कधी तुटत नसते. गावातील नागरिक आपल्यावर प्रेम करत असतात. त्या प्रेमापोटीच त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. गावातील प्रत्येकासाठी औषध पाठविले असन, ते पाच महिने पुरणार आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून गावातील नागिरक कोरोनापासून नक्कीच दूर राहतील. प्रत्येकानेच आपल्या गावासाठी थोडे-फार प्रयत्न केले तरी आपण कोरोनाला नक्कीच परतवू शकतो.'

दरम्यान, प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर असलेले तांबे दांपत्य एक वर्षापासून गावात येऊ शकले नाही. पण, गावाबाहेर राहून सुद्धा गावातील प्रत्येकाची ते आपुलकीने काळजी घेताना दिसतात. गावाला त्यांचा अभिमान असून, त्यांचे कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com