esakal | Coronavirus : मुंबईत तबलिगी समाजाच्या १५० व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus case Filed against 150 Persons of the Tabligi community in Mumbai

दिल्लीतील मकरजला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुंबईतील तबलिगी समाजातील 150 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती लपविल्याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus : मुंबईत तबलिगी समाजाच्या १५० व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : दिल्लीतील मकरजला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुंबईतील तबलिगी समाजातील 150 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती लपविल्याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील 150 व्यक्ती तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या. तसेच, त्यांची माहिती लपविल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन बीएमसीला हेल्पलाईनच्या आधारे कळवावे अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई करण्यात आली आहे.

चिंताजनक : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत दाखल

आमीर अनिस रेहमान खान, फैयाज शिरगावकर, अली हुसेन रहिमतुत्ताशेख, मो. नाहिद अहमद शेख, इस्माईल इब्राहिम सिद्दीकी, अब्दुल अजिज खान, मोहम्मद हमजा, सरफराज मोदी, मोहम्मद अल्ताफ खान, सोहेल मोहम्मद मुक्तार पटेल अशा एकूण 150 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८६८; आतापर्यंत तपासले एवढे नमुने

महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन त्यानुसार साथीचा रोग पसरवण्यास मदत केल्याप्रकरणी, तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहूनही माहिती लपविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top