हॉटस्पॉट म्हणजे काय? काय निर्बंध असतात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. यामुळे शहरांमध्ये हॉटस्पॉट तयार केले जात असून, तेथील नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध लादले जात आहेत. हॉटस्पॉट म्हणजे काय? आणि संबंधित परिसरात राहणारे नागरिकांनी काय करायला हवे, याबाबत जाणून घेऊयात...

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. यामुळे शहरांमध्ये हॉटस्पॉट तयार केले जात असून, तेथील नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध लादले जात आहेत. हॉटस्पॉट म्हणजे काय? आणि संबंधित परिसरात राहणारे नागरिकांनी काय करायला हवे, याबाबत जाणून घेऊयात...

लॉकडाऊनच्या काळात 'ही' वस्तू झाली व्हायरल...

हॉटस्पॉट म्हणजे काय?
हॉटस्पॉट म्हणजे एखाद्या भागात कोरोनाची लागण झालेले जास्त रुग्ण असतील तर तो भाग हॉटस्पॉट म्हणून संबोधला जातो. संबंधित परिसर सील केला जातो. शिवाय, तेथील नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध घातले जातात. हॉट स्पॉट्स अंतर्गत, परिसर, सोसायटी, अपार्टमेंट किंवा एखाद्या विशिष्ट रस्त्याचे भाग पूर्णपणे बंद केला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी घेणार मोठा निर्णय...

हॉटस्पॉट परिसरात काय निर्बंध असतात?
हॉटस्पॉट परिसरातील सर्व रस्ते बंद केले जातात. कोणतेही दुकान उघडण्यास परवानगी नसते. प्रत्येक महत्वाच्या वस्तूची होम डिलीव्हरी प्रशासनाकडून केली जाते. रुग्णवाहिका, अग्निशमन दलालादेखील प्रवेशासाठी परवानगी घ्यावी लागते. हॉटस्पॉट भागात माध्यमांच्या प्रवेशावरही बंदी आहे. फक्त डॉक्टरांना जाण्याची परवानगी आहे पण तेही खास पासमधून. संसर्गाची काही चिन्हे आहेत की नाही किंवा जर एखाद्या व्यक्तीने सकारात्मक रूग्णाच्या संपर्कात येत असेल तर ते शोधून काढले जाते.

वकील चिडून न्यायाधिशांना म्हणाला, तुम्हांला कोरोना होईल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus hotspot and hotsopt area information