esakal | ‘मरकज’ला गेलेल्या १३०० जणांचा शोध लागला; आता काय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus maharashtra found 1300 people tablighi jamaat markaz rajesh tope

गेल्या आठवड्यात बुलडाण्यात ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, ते देखील मरकजमध्ये उपस्थितीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

‘मरकज’ला गेलेल्या १३०० जणांचा शोध लागला; आता काय होणार?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई Coronavirus : दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी मरकजच्या कार्यक्रमाला राज्यातून १४०० लोक सहभागी झाले होते. यापैकी १३०० जणांची नावे आणि ठिकाणांची यादी हाती आली असून, त्यांना क्वारंटाइन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या आठवड्यात बुलडाण्यात ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, ते देखील मरकजमध्ये उपस्थितीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार असून त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे, असे ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली.

आणखी वाचा - युरोपमध्ये या देशात 24 तासांत सर्वाधिक कोरोना बळी

दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकज कार्यक्रमाला राज्यातून अनेकजण सहभागी असल्याची माहिती मिळाल्याने राज्य सरकार दक्ष होते. यात प्रत्येक जिल्ह्यातील काही लोक गेले होते. होती. त्यापैकी १३०० लोकांना क्वारंटाइन करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा शोध लागला आहे. सामाजिक संस्था, ‘एनएसएस’चे कार्यकर्ते, होमगार्ड यांच्या सर्वांच्या साहाय्याने त्यांना विश्वासात घेऊन क्वारंटाइन करणार असल्याचे टोपे म्हणाले.

कलम 144ची ऐशी तैशी; प्रशासन सॅनिटायझर लावण्यात बिझी

दरम्यान, मरकजचा कार्यक्रम सुरुवातीला महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला होता. वसईमध्ये हा कार्यक्रम होणार होता. पण, महाराष्ट्र सरकारने त्याला परवानगी नाकारल्यानंतर कार्यक्रम दिल्लीत घेण्याचे ठरले. त्यामुळं महाराष्ट्रावरचं मोठ संकट टळल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तरीही महाराष्ट्रातून मरकजला गेलेल्यांची संख्या 1300वर आहे. या 1300 जणांपासून त्यांचे कुटुंबिय आणि इतरांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळं मरकजला गेलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत असून, त्यांच्या नातेवाईकांच्या प्रकृतीवरही नजर ठेवण्यात येत आहे. 

loading image