Coronavirus : 'तबलिगी ए-जमाती'च्या मेळाव्यातील 22 जणांचा शोध सुरूच!

Tablighi-Crisis
Tablighi-Crisis

पुणे : निजामुद्दीन येथे 'तबलिगी ए-जमाती'च्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील नागरिकांची संख्या 344 इतकी झाली आहे. त्यापैकी 22 जणांचा अद्याप शोध लागला नसून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

तबलिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या पुणे विभागातील 258 नागरिकांची यादी शुक्रवारी प्राप्त झाली होती. त्यामध्ये 86 जणांची भर पडली असून ही संख्या आता 344 झाली आहे. त्यापैकी एकूण 213 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामध्ये शुक्रवारी 163 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात होते. आता आणखी 50 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या नागरिकांपैकी चारजण कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे झालेल्या मेळाव्याला गेलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत 344 नागरिकांची यादी मिळाली आहे. या यादीतील काही नागरिक हे प्रत्यक्ष मेळाव्यात सहभागी झाले होते, तर काहीजण हे त्या परिसरात आढळून आले आहेत. शनिवारी 50 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. या यादीतील 31 जण हे पुणे विभागाच्या बाहेरील असून, 48 जण परराज्यातील आहेत. 22 जणांचा शोध घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com