बापरे! पहिली, दुसरीचा अभ्यासक्रम छापला एकसारखाच; शैक्षणिक दिनदर्शिकेचा गोंधळ; 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या मार्गदर्शनासाठी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेमुळे राज्यभर शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. 

मुंबई : ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या मार्गदर्शनासाठी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेमुळे राज्यभर शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. 

दिनदर्शिकेत पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम एकसारखाच छापण्यात आला होता. ही 'प्रिंटींग मिस्टेक' लक्षात आल्यानंतर दुसरीच्या अभ्यासक्रमात दुरूस्ती करून सुधारित दिनदर्शिकेची पीडीएफ काँपी प्रसिद्ध करण्यात आली. पण या दिनदर्शिका राज्यातील बहुसंख्य शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या नाही.

हेही वाचा: मुंबईनंतर आता MMR क्षेत्रातही ‘आकडों की हेराफेरी'; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप..

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नियमितपणे शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. म्हणून राज्य सरकारमार्फत डिजीटल माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. 

या दिनदर्शिकेचा वापर शिक्षक, पालक यांनी अत्यंत विचारपूर्वक करून विद्यार्थ्यांचे शिकवणे, अधिक समृद्ध करणे आवश्यक असल्याची माहिती परिषदेतर्फे दिली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत विद्यार्थी या दिनदर्शिकेचा वापर करून आपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेऊ शकणार आहे. ही शैक्षणिक दिनदर्शिका जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पाठ्यपुस्तकातील पाठांनुसार अभ्यास कसा करावा, असे सांगणारी आहे.

हेही वाचा: 'केईएम हॉस्पिटलनेच माझ्या मुलाचा जीव घेतला'; मृताच्या कुटुंबीयांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप..

परंतु शैक्षणिक दिनदर्शिकेत पहिली आणि दुसरीचा एकसारखा अभ्यासक्रम छापण्यात आला आहे. या गोंधळाने शिक्षक व पालक गोंधळात पडले आहेत. ही चूक लक्षात आल्यानंतर परिषदेने सुधारित फाइल वेबसाईटवर अपलोड केली. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अलिबाग, तळा, रोहा, कोलाड भागातील जिल्हा परिषद शिक्षकांकडे पहिली दुसरीचा एकसारखाच अभ्यासक्रम असलेली दिनदर्शिका आहे. 

शिक्षण विभागाने काढलेल्या सुधारित दिनदर्शिकेविषयी या शिक्षकांना माहीती नव्हते. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले की, दिनदर्शिकेची सुरूवातीला वेगळी फाईल अपलोड झाली होती. मात्र नंतर लगेचच नवी फाईल वेबसाइटवर अपलोड केल्याचे केली.

course of first and second standards printed exactly same 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: course of first and second standards printed exactly same