esakal | मोठी बातमी : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन!
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 new strain maharashtra dr. raman gangakhedkar

महाराष्ट्रात कोरोनाच्या दोन नव्या स्ट्रेनचे 15 ते 20 टक्के रुग्ण असल्याची माहिती आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना दिली.

मोठी बातमी : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : गेल्या काही दिवसांत देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त रुग्ण आढळत असल्याचे दिसत आहे. या सगळ्यात आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशातील 18 राज्यांमध्ये कोरोनाचा डबल म्युटन्ट वेरिएंट आढळून आला असल्याची माहिती केंद्र सरकारने नुकतीच दिली आहे. हा डबल म्युटन्ट वेरिएंट जगात ब्रिटन, दक्षिण अफ्रिका या देशांमध्ये आढळून आला होता. देशात एक-दोन नव्हे तर, 18 राज्यांमध्ये या वेरिएंटचे कोरोना रुग्ण आढळले असल्यामुळं आता चिंता वाढली आहे. विशेषतः महाराष्ट्रात या स्ट्रेनचे 15 ते 20 टक्के रुग्ण असल्याची माहिती आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना दिली. त्यामुळं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन कितपत धोकादायक आहेत. यामुळं मृत्यूचं प्रमाण वाढणार की नाही, याबाबत आता भाष्य करणे योग्य नाही, या स्ट्रेनचा धोका तपासून घ्यावा लागेल, असे मतही डॉ. गगाखेडकर यांनी व्यक्त केले आहे.

देशातील परिस्थिती
देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून, त्याचे नवे प्रकार सध्या दिसत आहेत. जगभरातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक धोकादायक आहेत. भारतातही या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात १८ राज्यांमध्ये ७७१ डबल म्युटन्ट वेरिएंट रुग्ण आढळून आले आहेत. ७३६ रुग्णांमध्ये ब्रिटनममध्ये सापडलेल्या स्ट्रेनशी साधर्म्य दाखवणार म्युटंट आहे. ३४ रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या स्ट्रेनशी साधर्म्य दाखवणारा म्युटन्ट आढळल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

आणखी वाचा - पुणेकरांची धुलवड यंदाही नाहीच

पुण्यात 80 टक्के रुग्ण घरांत
महाराष्ट्रात कोरनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असले तरी, कोरोना रुग्णांची लक्षणीय संख्या ही पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच मुंबई शहरात आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असताना दिसत आहे. पुण्यात रोज जवळपास तीन हजार नवे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्सवर ताण येण्याची शक्यता असली तरी, पुण्यातील बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे जवळपास 80 टक्के कोरोना रुग्णांना घरांत क्वारंटाईन करण्यात आलं असून, त्यांना तेथेच उपचार देण्यात येत आहेत.

आणखी वाचा - पुण्यात विश्रामबाग वाडा अंधारात

महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन आढळले आहेत. मात्र, ते कितपत धोकादायक आहेत हे तपासावे लागले. सध्या तरी आपल्याला लागण होऊ नये, आपल्या आजूबाजूच्या लोकांना याची लागण होऊ नये, यासाठी नियमांचं पालन करण्याची गरज आहे.
- डॉ. रमण गंगाखेडकर, आयसीएमआरचे माजी संचालक

loading image