esakal | 'डीएचएफएल'ची 87 हजार 905.6 कोटींची देणी!
sakal

बोलून बातमी शोधा

DHFL

डीएचएफएलला कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था, बँका आणि बाँडधारकांचे एकत्रितरित्या कंपनी 86 हजार 892.3 कोटी रुपयांचे देणे लागते.

'डीएचएफएल'ची 87 हजार 905.6 कोटींची देणी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : दिवाण हाऊसिंग फायनान्सवर (डीएचएफएल) विविध बँका, वित्तसंस्था, बाँडधारक, कर्मचारी आणि इतर घेणेकऱ्यांनी सुमारे 87 हजार 905 कोटी रुपयांचा दावा लावला आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेली डीएचएफएल सध्या नादारी आणि दिवाळखोरी संहितेनुसार दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरी जाते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध वित्तसंस्था, बँका आणि गुंतवणूकदारांना देणे असलेल्या रकमेची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यात डीएचएफएलच्या मुदत ठेवींदारांचा समावेश नाही. मुदत ठेवींचे 6 हजार 188 कोटी रुपयांच्या दाव्यावर कंपनीकडून मार्ग काढण्यात आला आहे. डीएचएफएलचे प्रशासक आर. सुब्रमणियन यांच्याकडे यांसंदर्भातील तोडगा कंपनीने सादर केला आहे.

- कर्जदारांना मोठा दिलासा, 'या' बँकेने केली व्याजदरात कपात

डीएचएफएलला कर्ज देणाऱ्या वित्तसंस्था, बँका आणि बाँडधारकांचे एकत्रितरित्या कंपनी 86 हजार 892.3 कोटी रुपयांचे देणे लागते. तर बाँडधारकांचे यात 45 हजार 550.7 कोटी रुपये आहेत. तर उर्वरित कर्ज देणाऱ्या संस्थांचे 41 हजार 342.23 कोटी रुपये डीएचएफएलकडे थकलेले आहेत.

- जानेवारी 2020 मध्ये बॅंकांना 10 दिवस सुटी 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे डीएचएफएलकडे सर्वाधिक 10 हजार 082.9 कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. त्याखालोखाल बँक ऑफ इंडियाचे 4 हजार 125.52 कोटी रुपये, कॅनरा बँकेचे 2 हजार 681.81 कोटी रुपये, नॅशनल हाऊसिंग बँकेचे 2 हजार 433.79 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाचे 2 हजार 378.05 कोटी रुपये, सिंडिकेट बँकेचे 2 हजार 229.29 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाचे 2 हजार 074.92 कोटी रुपये डीएचएफएलकडे थकलेले आहेत. 

याव्यतिरिक्त डीएचएफएलच्या प्रशासकांकडे बांधकाम क्षेत्रातील चार कंपन्यांनी मिळून 950.53 कोटी रुपयांचा दावा केला आहे. 

- एसबीआयच्या 'एटीएम'मधून पैसे काढताय; तर ही बातमी नक्की वाचा!

रिझर्व्ह बँकेने 20 नोव्हेंबरला डीएचएफलचे संचालक मंडळ बरखास्त करत हे प्रकरण दिवाळखोरी न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) हस्तांतरित केले होते. डीएचएफएलचे एकूण 1 लाख मुदतठेवी धारक आहेत. एनसीएलटीकडे प्रकरण गेलेली डीएचएफएल ही देशातील पहिली बिगर बँकिंग वित्त संस्था आहे.

loading image