Uddhav Thackeray and Narendra Modi
Uddhav Thackeray and Narendra Modi

Shivsena : मूठभरांची जावो, प्रजेची सत्ता येवो! 'सामना'तून मोदी सरकारवर कडाडून टीका

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका करते. आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा कऱण्यात येत आहे. आजचं औचित्य साधून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे. देशातील संपत्ती मूठभर लोकांच्या हाती असल्याचं म्हणत, सामनातून निशाणा साधण्यात आला. (Narendra Modi-Uddhav Thackeray news in Marathi)

Uddhav Thackeray and Narendra Modi
Future Retail : रिटेल किंग किशोर बियाणी यांचा चेअरमनपदाचा राजीनामा; कारण...

'सामना'त म्हटलं की, निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य उपाशी, असं चित्र देशाच्या प्रजासत्ताक दिनी आहे. यात भविष्यात बदल घडवावाच लागेल. तसेच मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून जनतेचं राज्य आणण्यासाठी जनतेलाच एकजूट दाखवावी लागणार आहे. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन चिरायू ठेवायचा असेल तर मूठभरांचा सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल, असंही सामनाच्या आग्रलेखात म्हटलं आहे.

Uddhav Thackeray and Narendra Modi
Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ

प्रजासत्ताक दिन आहे. मात्र शेतकऱ्यांना, गोरगरिब शेतमजुरांना, कामगार कष्टकऱ्यांना बेरोजगार, तरुणांना ही प्रजेची सत्ता वाटते का? आज लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला जाईल. देशाला उद्देशून भाषण होईल. देशातील विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे चित्ररथही पाहायला मिळातील. मात्र लोकांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न असंख्य आहेत. त्याची उत्तरे यातून मिळणार आहेत का, असा प्रश्नही सामनातून उपस्थित कऱण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com