Future Retail : रिटेल किंग किशोर बियाणी यांचा चेअरमनपदाचा राजीनामा; कारण...

kishore biyani
kishore biyani

नवी दिल्ली - उद्योगपती किशोर बियाणी यांनी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या (एफआरएल) निलंबित संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या कारवाईचा सामना करत आहे. फ्युचर रिटेलने शेअऱ मार्केटला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, कंपनीचे कार्यकारी संचालक आणि निर्देशक बियानी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

kishore biyani
Satyajeet Tambe : अपक्ष फॉर्म संदर्भात सत्यजीत तांबेंचा मोठा खुलासा

कंपनीच्या सोल्यूशन प्रोफेशनलला २४ जानेवारी २०२३ रोजी ईमेलद्वारे ही माहिती मिळाली. बँक ऑफ इंडियाचे कर्ज थकवल्याबद्दल एफआरएलला दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. २००७ पासून फ्युचर रिटेल लिमिटेडशी संलग्न असलेले किशोर बियानी यांनी म्हटलं की, दुर्दैवी व्यावसायिक परिस्थितीमुळे कंपनीला सीआयआरपीला (कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेला) सामोरे जावे लागत आहे. कंपनीशी माझे भावनिक संबंध आहेत. मी कंपनीच्या वाढीसाठी सर्वकाही केले, पण मला वास्तव स्वीकारावे लागेल आणि पुढे जावे लागेल.

kishore biyani
Somyag Yadnya Utsav : म्हापसा येथे पाच फेब्रुवारीपासून ‘सोमयाग यज्ञ उत्सव’

६१ वर्षीय किशोर बियाणी यांनीही कर्जदारांना सहकार्याचे आश्वासन दिले आहे. राजीनामा दिला असला तरी माझ्या मर्यादित संसाधनांच्या बळावर आणि कंपनीशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याच्या क्षमतेच्या जोरावर मी सर्वतोपरी मदतीसाठी उपलब्ध राहीन, असे ते म्हणाले.

किशोर बियानी हे भारतातील रिटेल किंग म्हणूनही ओळखले जात होते. भारतातील आधुनिक किरकोळ क्षेत्राचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com