Maharashtra New District: महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती कधी होणार? महत्वाची माहिती आली समोर

news district in mahrastra eknath shidne devndra fadanvis
news district in mahrastra eknath shidne devndra fadanvis sakal

Maharashtra New District: महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मात्र, काही तालुक्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

news district in mahrastra eknath shidne devndra fadanvis
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना करावी लागली महादेव जानकर यांची मनधरणी, मात्र झालं तरी काय होतं ?

नवीन तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आगामी तीन महिन्यांत तालुक्यांच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात येणार आहे. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली असली, तरी तहसील कार्यालय नाही, अधिकारी व कर्मचारी नाहीत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

देवलापार येथे नियुक्त करण्यात आलेले नायब तहसीलदार उन्मेष पाटील हे केवळ दहा दिवसच रुजू झाले. तेव्हापासून ते तालुक्यात फिरकलेच नसल्याचे सांगितले. विखे-पाटील यांनी त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सांगून सेवेतून बडतर्फ केले जाईल, असे सांगितले.

news district in mahrastra eknath shidne devndra fadanvis
Eknath Shide Dasara Melava: 'जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही हं'!

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नव्या जिल्हानिर्मितीचा मुद्दा रेटला. गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवा जिल्हा करण्याची घोषणा दोनदा झाली. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचाही प्रस्ताव होता. मात्र, काहीही झाले नाही. तालुके जास्त आहेत. जिल्हे कमी आहेत.

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघता नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची वडेट्टीवार यांनी मागणी केली. नाना पटोले यांनीही नवीन जिल्हानिर्मितीचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना विखे पाटलांनी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी उद्‍भवतात. पैसाही भरपूर लागतो. त्यामुळे हा विषय सध्या सरकाच्या धोरणात नसल्याचे स्पष्ट केले.

news district in mahrastra eknath shidne devndra fadanvis
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना करावी लागली महादेव जानकर यांची मनधरणी, मात्र झालं तरी काय होतं ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com