
Cyclone Shakti Heads Toward Gujarat IMD Predicts Reduced Intensity
Esakal
अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ घोंगावत असून येत्या दोन दिवसात ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्याची तीव्रता जास्त नसेल. ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाहीय. मात्र मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलंय.