Datta Jayanti Vishesh : इथे साक्षात राहिले होते दत्त गुरू; या मंदिराला नक्की भेट द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Datta Jayanti Vishesh

Datta Jayanti Vishesh : इथे साक्षात राहिले होते दत्त गुरू; या मंदिराला नक्की भेट द्या

Datta Jayanti Vishesh : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त गुरुंचा जन्म झालेला, म्हणून त्या दिवशी दत्त गुरुंचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. याही वर्षी ०७ डिसेंबरला दत्त जयंती आहे.

हेही वाचा: Datta Jayanti 2022 : दत्त जयंतीला पुजा केल्याने मिळते पितृ-दोषांपासून मुक्ती, जाणून घ्या पूजा विधी अन् मंत्र

असं म्हणतात, दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असत. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केली तर दत्ततत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. त्यामुळे सगळे लोकं मंदिरात दर्शन घेयला जात असतात; त्यात एकमुखी दत्ताच दर्शन घेण्याचं खूप महत्व आहे.

हेही वाचा: Datta Jayanti 2020: दत्ता दिगंबरा कोरोनाला लवकर घालव; उदगीरमधील भाविकांचं साकडं

असच एक मंदिर म्हणजे पुण्याजवळच नारायणपूर इथलं दत्त मंदिर. पुण्यापासून ३०-३५ किमी अंतरावर एकमुखी दत्ताच मंदिर आहे. मुळात एकमुखी आणि षडभूजा असलेल्या दत्तमूर्तीमुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. साधारण आपण त्रिमूर्ती असलेलीच मूर्ती बघितली आहे पण ही एकमुखी मूर्ती आहे. त्यासमोर संगमरवरी पादुका आहेत.

हेही वाचा: Datta Jayanti 2020 : ''दिगंबरा...दिगंबरा'चा नारायणपुरात जयघोषात दत्तजन्म सोहळा साजरा

दत्तभक्त इथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. येथे दत्तजयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक खास करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकायला येतात.

हेही वाचा: Tina Datta : अभिनेत्री टीना दत्ताने विकल्या भाज्या, लोक मात्र हैरान

तुम्ही सासवड रोडने पुण्याच्या दिवेघाटातून सासवडला जाऊ शकतात किंवा सातारा रोडने नारायणपूरकडे डावीकडे वळून पोहोचू शकतात. हे मंदिर पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव आहे. यागावात जून औंदूंबराचं झाड आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी आहे. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात. "जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता" असा मंत्र इथे जपला जातो.