Datta Jayanti 2020 : ''दिगंबरा...दिगंबरा'चा नारायणपुरात जयघोषात दत्तजन्म सोहळा साजरा

Datta Jayanti 2020 : ''दिगंबरा...दिगंबरा'चा नारायणपुरात जयघोषात दत्तजन्म सोहळा साजरा
Updated on

गराडे - श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. 28) दत्तजन्म सोहळा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी उत्साहात सदगुरू नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सोहळ्यासाठी दरवर्षी विविध राज्यांतून लाखो भाविकांनी हजेरी लावतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांनुसार दत्तजन्म सोहळा पार पडला. 

मंदिरात फुलांची सजावट, विद्युतरोषणाई, रांगोळ्या काढून मंदिर सुशोभित करण्यात आले होते. वैभवकाका काळे यांचे दत्त जन्माचे आख्यान झाले. त्यानंतर नाव ठेवणे, पाळणा होऊन "दिगंबरा...दिगंबरा'च्या जयघोषात "श्रीं'वर पुष्पवृष्टी करण्यात आली. देवभेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले. 

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री उल्हास पवार, आमदार संजय जगताप, डी.वाय पाटील, अण्णासाहेब घोलप, भारत विकास ग्रुपचे हनुमंत गायकवाड, पोपट महाराज, भरतनाना क्षीरसागर, रामभाऊ बोरकर, राहुल घुगे, राजेश माने, दादा भुजबळ, राहुल जाधव, संजयनाना जगताप, विलास जगताप, एम.के. गायकवाड, बबनराव टकले उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com