
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावून शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते
उदगीर (जि.लातूर) : हत्तीबेट (देवर्जन) ता. उदगीर येथील हत्तीबेट गडावर दत्त जयंती निमित्त श्री गंगाराम बाबा यांच्या समाधीची उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली.
येथील हत्तीबेट गडावर गेल्या अनेक वर्षापासून दत्त जयंती निमित्त मोठी यात्रा भरते मात्र यावेळी कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच यात्रा रद्द करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावून शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी कोरोना परिस्थितीच्या सर्व नियमावलीची काळजी घेत दर्शन घेतले.
गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी पंतप्रधान मोदींना पार्सल
यावेळी मुख्याधिकारी श्री राठोड, सुमन राठोड, उदगीर आगाराचे आगार प्रमुख यशवंत कानतोडे, पुजारी गंगाराम गोसावी, व्ही एस कुलकर्णी आदीच्या उपस्थितीत गंगाराम बुवा समाधी पूजन करण्यात आले. गडावरील श्री दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर येथे ही आरती करण्यात आली.
हत्तीबेट परिसरातील अनेक गावातील नियमित दर्शन घेणारे भाविक भक्त दत्त जयंती व पौर्णिमेनिमित्त मास्कचा वापर करत गंगाराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले व कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
(edited by- pramod sarawale)