'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार' I Balasaheb Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

'विधान परिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला याचं शल्य निश्‍चित आहे.'

'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार'

sakal_logo
By
हेमंत पवार

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यातील मतदारांनी मला थेट बॅंकेत जाण्याची संधी दिलीय. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय संदर्भ वेगळे असतात. मात्र, निडवणुकीमुळे राजकीय समीकरणं बदण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूचक वक्तव्य सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंगळवारी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील विजयानंतर केले.

हेही वाचा: भाजपच्या साथीनं NCP सहकारमंत्र्यांकडून 'काँग्रेस'चा करेक्ट कार्यक्रम

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री पाटील विजयी झाले. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळा यांच्याकडून निवडून आल्याचे प्रमाणपत्र स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलला चांगले यश मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून यश मिळेल, अशी परिस्थिती होती. अर्ज माघारीच्या दिवशी ११ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सहकार पॅनेलचा विजय झाला. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी माझ्यावर सहकारमंत्री आणि सातारा जिल्‍ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळं वेगळे महत्व या निवडणुकीला प्राप्त झाले. ही निवडणूक महत्वाची होती.

हेही वाचा: शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव; पाहा व्हिडिओ

निवडणुकीसाठी तुम्ही भाजपच्या नेत्यांची मदत घेतली आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुका या राजकीय गटतट विसरुन केल्या जातात. मला कऱ्हाड दक्षिणमधील डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, मदनराव मोहिते, भीमरावदादा पाटील, जगदीश जगताप, धनंजय पाटील, कऱ्हाड उत्तरमधील मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील व सहकाऱ्यांनी निवडणुकीत सहकार्य केल्याने हा विजय झाला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यातील मतदारांनी मला बॅंकेत थेट जाण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा: 'शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; पण..'

शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं शल्य

विधानपरिषदेचे सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला याचं शल्य निश्‍चित आहे, असे सांगून सहकारंत्री पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर शशिकांत शिंदेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती मला आत्ताच पोलिसांनी दिली. शशिकांत शिंदेंच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न केले. सर्वांशी चर्चा केली. मात्र, जे मतदार बाहेरगावी गेले होते. ते लवकर आले नाहीत. त्यामुळं हा तणाव वाढत गेला. त्याचा निकालावर परिणाम झाला आहे, तरीही शशिकांत शिंदे यांनी उशीरा सुरुवात करुन चांगली मजल गाठलीय.

हेही वाचा: आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम करून शिवेंद्रराजेंनी धरला गाण्यावर ठेका

loading image
go to top