'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय'; शिंदेंच्या पराभवानंतर शिवेंद्रराजे, महेश शिंदेंचा तुफान डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara District Bank Election

आमदार शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गाण्यावर ठेका धरला.

शिंदेंच्या पराभवानंतर शिवेंद्रराजे, महेश शिंदेंचा तुफान डान्स

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज झालेल्या मतमोजणीत ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारल्यानंतर मेढ्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्यावर तुफान डान्स केला, तर आमदार शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही रांजणे यांच्या विजयी सभेत चक्क गाण्यावर ठेका धरत रांजणेंच्या हातात हात घालून डान्स केला.

गेली कित्येक दिवस हुलकावणी देणारा विजय आज शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्त अनुभवण्यास मिळाला. त्यामुळं सर्वचजण फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बेभान झाले होते. या मिरवणुकी दरम्यान शेखर गोरे यांनी विविध प्रकारच्या पोज दिल्या. एकदा त्यांनी दंड थोपटून पहिलवानकीची पोझ दिली, तर परत त्यांनी हाताने नेम धरुन बंदुकीतून गोळी झाडल्यासारखे हावभाव केले. त्यामुळं त्यांनी हा नेम कोणावर धरला व कोणाचा गेम केला याची चर्चा सुरु झालीय.

हेही वाचा: रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

रांजणेंच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या मानकुमरेंनी नाचून आपला आनंद व्यक्त केला. शिवाय, आमदार महेश शिंदे यांनी विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्यावर ताल धरत कार्यकर्त्यांचे मन जिंकले. एकंदरी, या निकालानंतर कार्यकर्त्यांत मोठा जल्लोष पहायला मिळाला.

हेही वाचा: 'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार'

loading image
go to top