ITI Admission Deadline : आयटीआयमध्ये प्रवेशासाठी इच्छूकांना 11 जुलैपर्यंत मुदत; या संकेतस्थळावर करा अर्ज

ITI Admission
ITI Admission sakal media

ITI Admission : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (Deadline for aspirants to get admission in ITI is 11th July nashik news)

त्याअनुषंगाने दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ११ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. एम. कुदळे यांनी केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज नोंदवून झाल्यावर आपला प्रवेश निश्चित करावा व त्यानंतर विकल्प द्यावेत. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत असून विविध अभ्यासक्रमांची त्यांना माहिती देण्यात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ITI Admission
Mumbai News : मागाठाणे मेट्रो स्थानकाचे IIT करणार परीक्षण करणार; काही दिवसांपूर्वी खचला होता रस्ता

त्याचप्रमाणे विविध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे.

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते.

त्याअनुषंगाने दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयमधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन श्री. कुदळे यांनी केले आहे.

ITI Admission
Watch Video : IIT कानपूरचं मोठं यश! आता दुष्काळी भागात पडणार कृत्रिम पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com