मोठी बातमी! राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना आता दरमहा मिळणार अवघे ५०० रुपयेच; आयकर विभागाकडील माहितीवरुन घटणार महिला लाभार्थींची संख्या

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो, तरीपण केंद्र- राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये, असे एकूण १२ हजार रुपये (दरवर्षी) शेतकरी लाभार्थीस मिळतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात, त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे ५०० रुपयेच मिळणार आहेत.

ऐन विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि कागदपत्रांची शिथिलता दिल्याने राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. पहिले तीन हप्ते त्यांना मिळालेही, पण त्यानंतर निकषांवर बोट ठेवून अपात्र लाभार्थींना वगळण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.

शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकास घेता येतो, तरीपण केंद्र- राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी, ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आहेत, त्यांना दीड हजाराऐवजी आता यापुढे ५०० रुपयेच दिले जाणार आहेत.

५०० रुपये मिळाल्याच्या महिलांच्या तक्रारी

जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्यावेळी ५०० रुपयेच मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु, त्यांना नेमके ५०० रुपयेच मिळाले आहेत किंवा कमी रक्कम का मिळाली, याची पडताळणी आमच्या स्तरावर होत नाही. त्यामुळे त्याचे नेमके कारण सांगता येत नाही.

- प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

आता लक्ष अडीच लाख उत्पन्नावर...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील दोन कोटी ५८ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाखो महिला असू शकतात, असा महिला व बालकल्याण विभागाला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने असलेल्यांची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली, तशीच माहिती पॅनकार्डवरुन लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती, याची माहिती आयकर विभागाकडून मागविण्यात आली आहे.

‘शेतकरी सन्मान निधी’ची स्थिती

  • एकूण लाभार्थी

  • ९३.२६ लाख

  • दरमहा लाभाची रक्कम

  • १,८६५ कोटी

  • अंदाजे महिला शेतकरी

  • १९ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com