esakal | अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...
sakal

बोलून बातमी शोधा

building

कोरोनानं देशात सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस नवी उच्चांकी गाठताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणं कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताहेत.

अरे देवा! दक्षिण मुंबईतल्या 'या' दोन इमारती ठरतायेत कोरोनाचा हॉटस्पॉट...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनानं देशात सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस नवी उच्चांकी गाठताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणं कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताहेत. अशातच दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध इमारती कोरोनाचा हॉटस्पॉट होताना दिसताहेत. शनिवारी दक्षिण मुंबईत असलेल्या या दोन्ही इमारतींमध्ये 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं मुंबई महापालिकेनं या इमारती सील केल्यात. 

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

राज्य सरकार आणि महानगरपालिकेने 5 जूनपासून मुंबईत काही निर्बंध शिथिल करुन शहर काही प्रमाणात अनलॉक केलं. या अनलॉकमध्ये घरकाम करणारे कर्मचारी आणि वाहनचालकांवर बंदी नसली तरी अनेक गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या प्रवेशास तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान, या दोन्ही इमारतींमध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या इमारतींमध्ये याआधी घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी नव्हती. 

क्या बात है! 20 दिवसांच्या लढाईनंतर 'त्यांनी' केली कोरोनावर यशस्वी मात... 

भुलाभाई देसाई रोडवरील सागर दर्शन इमारतीत दहा आणि नेपियन सी रोडवरील टहनी हाइट्समध्ये 22 रुग्णांची नोंद झाली आहेत. अजूनही कोरोनाचे रुग्ण समोर येत असल्याने सर्व इमारतीतील रहिवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असे डी वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. प्रक्रियेनुसार, इमारती सीलबंद करण्यात आल्या आणि केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. सागर इमारतीत सापडलेले रुग्ण हे बहुतांश रहिवाशी आहेत. तर टहनी हाइट्समधील 20 रुग्ण हे घरकाम करणारे कर्मचारी आहेत.

रुग्णांना होम क्वारंटाईन करणं ठरतंय फायदेशीर; गंभीर रुग्णांसाठी बेड्स झाले रिकामे.. 

डी वॉर्डमध्ये कंटेंटमेंट झोन असल्याने घरगुती मदतनीस आणि वाहनचालकांना इमारतींमध्ये प्रवेश देण्याच्या मुद्यावर आमचा इमारतीतल्या सदस्यांसोबत वाद झाला. मात्र एकाच इमारतीत 22 प्रकरणे आढळून आल्यानंतर आम्ही जोखीम घेऊ शकत नाही, असं नाव न सांगण्याच्या अटीवर, मलबार हिलमधील इमारतीच्या सेक्रेटरीने सांगितले.

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड

18 जूनपर्यंत डी वॉर्डमध्ये 1,950 प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी 1,023 लोकांना घरी सोडण्यात आलं. दैनंदिन विकास दर 2.2 टक्के आहे जो शहराच्या वाढीच्या घटनांच्या बरोबरीचा आहे. या प्रभागात पारेखवाडी, गिरगाव चौपाटीजवळील मनपा चाळी, दर्या सागर झोपडपट्टी, सुमित पात्रा चाळी, जुना चिखलवाडी, गामडिया कॉलनी जवळील मारवाडी चाळी, बीआयटी चाळ आणि सिमला नगर झोपडपट्टी अशा आठ झोपडपट्ट्यांचा समावेश आहे.

loading image
go to top