पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबतचा निर्णय लांबणीवर

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता या शिष्यवृत्ती परीक्षांकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
Exam
ExamSakal

पुणे - राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोनाच्या (Corona) परिस्थितीचा आढावा घेऊन आता लवकरच इयत्ता पाचवी (Fifth) आणि आठवीच्या (Eighth) पुढे ढकललेल्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत (Scholarship Exam) निर्णय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या राज्य समितीच्या बैठकीत याबाबत सुतोवाच करण्यात आला. (Decision on Fifth Eighth Scholarship Examination Postponed)

राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता या शिष्यवृत्ती परीक्षांकडे पालकांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिलपासून ही परीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात आहे. या परीक्षेची सुरवातीला २५ एप्रिल त्यानंतर २३ मे अशा दोन वेळा तारीख बदलण्यात आली. मात्र २३ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून लवकरच परीक्षेची तारीख कळविण्यात येईल, असे परीक्षा परिषदेतर्फे १० मे रोजी काढलेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले. त्यानंतर जुलै महिना उजाडला, तरी अद्याप परीक्षेबाबत अद्यापही अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात संभ्रम कायम आहे. मात्र परिषदेच्या राज्य समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Exam
डीआरडीओची ‘ब्रिजिंग सिस्टिम’ सैन्यात दाखल

शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याबाबत सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा सर्वसाधारण आढावा, घेण्याबाबत परिषदेच्या राज्य समितीने सूचित केले आहे. त्यानुसार परीक्षेची योग्य तारीख निश्चित करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी परीक्षा परिषदेने केली आहे. त्या अनुषंगाने आढावा घेऊन पुन्हा पुढील आठवड्यात सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल आणि त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत यापेक्षा आणखी सुधारणा होणे, इतक्यात शक्य नाही. त्यामुळे परीक्षेबाबत योग्य तो निर्णय वेळीच घेऊन विद्यार्थ्यांवरील ताण कमी करावा, अशी मागणी शिक्षक, पालकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com