महाबीजच्या सोयाबीन बियाणेपुरवठ्यात घट

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 26 June 2020

अशी आहे सोयाबीन बियाणे स्थिती

  • एकूण सरासरी क्षेत्र : ३५ लाख हेक्टर
  • यंदा अपेक्षित लागवड : ४० लाख हेक्टर
  • राज्यासाठी किती बियाणे लागते : अंदाजे ३० लाख क्विंटल
  • शेतकरी स्वतःचे बियाणे किती वापरतात : २० लाख क्विंटल
  • बाजारात कंपन्या किती बियाणे विकतात : १० ते ११ लाख क्विंटल
  • महाबीज दरवर्षी किती बियाणे विकते : पाच लाख क्विंटल
  • यंदा महाबीजने किती बियाणे विकले : तीन लाख क्विंटल
  • खासगी कंपन्यांनी यंदा किती बियाणे विकले : ८ लाख क्विंटल

पुणे - बीजोत्पादनाच्या कालावधीत अनुकूल हवामान नसल्यामुळे यंदा सोयाबीनच्या बीजोत्पादनात दीड ते दोन लाख क्विंटलने घट आली आहे. तरीही, सोयाबीनच्या सहा वाणांचा अंदाजे तीन लाख क्विंटल विक्री महाबीजने केली आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोयाबीन बियाण्याच्या उगवणीत यंदा राज्यभर अडचणी आल्यामुळे महाबीजचे बीजोत्पादन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमती यंदा वाढविण्यात आल्या आहेत. बाजारात उपलब्धता देखील कमी आहे. मात्र, कसे तरी हाती आलेले बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात चालू हंगामात २० खासगी कंपन्यांनी अंदाजे आठ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे विकले आहे. उगवणीत अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी खासगी कंपन्यांनी नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महाबीजने स्वतःहून पुढे येत शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

‘पतंजली’च्या कोरोनिलवर राज्यात बंदी - देशमुख 

२० खासगी कंपन्यांकडून बियाणे
राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा दरवर्षी मोठा आधार असतो. सोयाबीन बियाणे पुरवणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून बियाणे उद्योगात महाबीजचा उल्लेख केला जातो. त्यामुळेच महाबीजने सोयाबीनचा दर काय ठरवला यावर लक्ष ठेवून खासगी कंपन्या दर निश्चित करतात. यंदा राज्यात परतीच्या पावसामुळे बीजोत्पादनात मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांच्या पुरवठ्यात महाबीजकडून दोन लाख क्विंटलची घट आली आहे.

राज्यातील किनाऱ्यांवरही शॅक्स 

पंचनामा समितीत महाबीज प्रतिनिधी
महाबीजच्या अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘कृषी विभागाच्या तालुकास्तरीय समित्यांकडून सोयाबीनच्या प्लॉटची पाहणी सुरू झाली आहे. या समितीमध्ये महाबीजचे देखील प्रतिनिधी आहेत. याशिवाय जिल्हा व्यवस्थापकांना देखील तपासणीच्या कामाला लावले आहे. प्रथमदर्शनी कमी उगवण असल्याचे लक्षात आल्यानंतर आमच्याकडे शिल्लक असलेल्या बियाण्यातून बियाणे बदलून दिले जाते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in soybean seed supply of Mahabeej