esakal | राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, दिवसभरात 39,624 रुग्णांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, दिवसभरात 39,624 रुग्णांना डिस्चार्ज

sakal_logo
By
अमित उजागरे

कालच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट पहायला मिळाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात 39,624 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजपर्यंत एकूण 29,05,721 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.21 टक्के झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: धक्कादायक! रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचे ३२० डोस चोरीला; गुन्हा दाखल

राज्यात आज दिवसभरात 58,952 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,952 झाली आहे. पण राज्यात अद्याप मृत्यूचे थैमान सुरूच असून दिवसभरात 278 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा: "सरकार म्हणेल तसं चालायला आम्ही मेंढरं नाही"; राज्यातील निर्बंधांना राजीव बजाज यांचा विरोध

आज नोंद झालेल्या 278 मृत्यूंपैकी 170 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 73 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 35 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण 6,12,070 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: आंबेडकरांनी संस्कृतला राजभाषा म्हणून निवडण्याचा मांडला होता प्रस्ताव - सरन्यायाधीश बोबडे

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,28,02,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35,78,160 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,55,206 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.