राज्यातील दूध पावडरच्या मागणीत झाली वाढ

राज्यातील दूध उत्पादन सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे दुधाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.
Milk Powder
Milk PowderSakal
Summary

राज्यातील दूध उत्पादन सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे दुधाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.

पुणे - राज्यातील दूध उत्पादन (Milk Production) सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे दुधाच्या मागणी (Demand) आणि पुरवठ्यात (SUpply) तफावत निर्माण झाली आहे. यामुळे दूध पावडरची (Milk Powder) मागणी वाढली आहे. परिणामी राज्यात दूध पावडर आणि बटरच्या (लोणी) (Butter) दरात प्रतिकिलो प्रत्येकी सरासरी सुमारे ५० रुपये वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच पावडर आणि लोण्याच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सद्यःस्थितीत राज्यात दूध पावडरला प्रति किलो २९० ते ३०० रुपये दर मिळू लागला आहे. बटरसाठी प्रतिकिलो ३४० ते ३५० रुपये दर मिळू लागला आहे. दूध पावडरचा हाच दर मागील तीन वर्षांपासून सातत्याने प्रतिकिलो २४० ते २५० इतका तर बटरचा (लोणी) प्रतिकिलो २९० ते ३०० रुपये होता. उन्हाचा वाढता तडाखा आणि दुधाळ जनावरांच्या संख्येत घट झाल्याने दूध उत्पादन सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यातच राज्याबाहेरील दूध संस्था राज्यातील दूध घेऊन जात असल्याने राज्यात दुधाची कमतरता जाणवू लागली आहे. दूध उत्पादन कमी झाल्याने पावडर उत्पादनासाठी आवश्‍यक तेवढे दूध मिळेनासे झाले आहे. यामुळे पावडर आणि लोण्याच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने हे दर वाढल्याचे सोनाई दूध परिवारचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.

Milk Powder
समर्थ रामदासच शिवाजी महाराजांचे गुरू; दानवेंनी राज्यपालांना सावरलं

याशिवाय राज्याबाहेरील दूध संस्था येथील दूध परराज्यात घेऊन चालल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यात दूध कमी पडू लागले आहे. दुधाची ही तूट भरून काढण्यासाठी पावडर निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांनी गाईचे दूध खरेदी दरात वाढ केली आहे. यानुसार शेतकऱ्यांना आता पावडर निर्मिती करणाऱ्या दूध संस्थांकडून प्रतिलिटर ३० रुपयांहून अधिक तर, अन्य सहकारी व खासगी दूध संस्थांकडून प्रत्येकी ३० रुपयांचा दर मिळू लागला असल्याचेही माने यांनी यावेळी स्पष्ट केले.

दूध पावडर निमिर्तीवर दृष्टीक्षेप

  • राज्यातील दूध पावडर प्रकल्पांची संख्या - १९

  • पुणे जिल्ह्यातील दूध पावडर प्रकल्प - ०५

  • राज्यात दररोज होणारे पावडर उत्पादन - ६०० मेट्रिक टन

  • एकूण उत्पादनात पुणे जिल्ह्याचा वाटा - ३०० मेट्रिक टन

  • राज्यातील रोजचे बटर उत्पादन - ३०० मेट्रिक टन

  • एकूण बटर उत्पादनात पुणे जिल्ह्याचा हिस्सा - १५० मेट्रिक टन

दूध पावडर उत्पादन करणारे प्रमुख देश

भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युक्रेन, रशिया.

जागतिक बाजारपेठेत २००९ पासून २०१९ पर्यंत दूध पावडर आणि बटरला फारसा दर मिळत नव्हता. २०१९ पासून ही परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली होती. परंतु त्यानंतर वर्षभरातच कोरोनाचे संकट सुरु झाले आणि पुन्हा दर पडले. त्यामुळे २०१९ पासून आतापर्यंत पावडर आणि बटरला चांगला दर मिळत नव्हता. यंदा तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर यात प्रतिकिलो प्रत्येकी ५० रुपयांची वाढ झाली आहे.

- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध परिवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com