deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray
deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray esakal

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच राज ठाकरेंच्या घरात औक्षण करून स्वागत

सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली
Published on

राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीस यांचे औंक्षण केले. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray)

deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray
बिचारे मुख्यमंत्री; मला त्यांची खूप काळजी वाटते - सुप्रिया सुळे

सत्तानाट्यानंतर शिंदेगट आणि भाजपने नवी सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३० जूनला शपथ घेतली.

यावेळी राज ठाकरे यांनी नव्या सरकारला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी पत्राद्वारे नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत आम्ही एकदा थेट भेटायला जाणार आहोत, असं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्याचा उद्देश होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र यापुढेही काहीतरी राजकीय हेतू असल्याचाही संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होतोय.

या भेटीदरम्यान, शाल आणि बुके देत फडणवीसांचे राज ठाकरे यांनी स्वागत केले. तर शर्मिला ठाकरे यांनी फडणवीसांचे औंक्षण केले.

देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावरून राज ठाकरेंना भेटणार असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ही भेट काही दिवसांपासून लांबणीवर पडली होती. आज शुक्रवारी अखेर फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. मात्र या भेटीत नेमकं काय घडलं, हे अद्याप समोर आलेलं नाही.

deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray
'त्या' विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी; म्हणाले...

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा आल्यानंतर भाजपा-राज ठाकरेंची जवळीक झाली. भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्वावरून एकमत झाले आहे.

मनसेला मंत्रिपद?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनेसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, 'आम्ही कोणत्याही अपेक्षेने भाजपाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र सभागृहात संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी मंत्रिपदाविषयी दिली होती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com