26 जानेवारी म्हणजे चार महिने नाही; मुनगंटीवार यांच्या आव्हानावर अजित पवार यांची गुगली

ajit pawar
ajit pawar

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपकडून सातत्यानं हे सरकार फार कार टिकणार नाही असं वक्तव्य करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही भाजपचेच काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. यातच नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पुन्हा पाडापाडीची चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एकमेकांना आव्हान देणं सुरू आहे. 

अजित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटलं की, राष्ट्रवादीचे नेते अनेकदा सांगतात की भाजपचे 20-25 आमदार संपर्कात आहेत. आता तुमचं सरकार येऊन 12 महिने झाले तरी तुम्ही भाजपचा एकही आमदार फोडू शकत नाही. कितीही डोकं आपटलं तरी तुम्हाला ते जमणार नाही असं म्हणत थेट अजित पवार यांना आव्हान दिलं होतं. 

मुनगंटीवार यांनी त्यानंतर एक ट्विटही केलं आहे. त्यात मुनगंटीवार यांनी म्हटलं की, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल तर येत्या 26 जानेवारीपर्यंत भाजपचा एकतरी आमदार फोडून दाखवा अन्यथा राजीनामा द्या. मुनगंटीवारांच्या या आव्हानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं की, मी 4 महिन्यात असे म्हणालो होतो आणि 26 जानेवारी म्हणजे 4 महिने होत नाही. कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीपूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

याआधी सभागृहात सुधीर मुनगंटीवार बोलत असताना म्हटलं होतं की, माझ्या भाषणात अडथळा आणणारे पुन्हा कधीच जिंकू शकत नाहीत. त्यांच्या या टीकेवर अजित पवार यांनी मी आव्हान स्वीकारतो मला पाडून दाखवा असं थेट आव्हान दिलं होतं. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं होतं की, भाजपचे जे आमदार राष्ट्रवादीत येतील त्यांना पुन्हा पोटनिवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी तीनही पक्ष मिळून एकच उमेदवार उभा करू आणि भाजपचा पराभव करु. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com