बळिराजाला मदतीसाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 3 March 2020

राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२) दिली. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई - राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून मदतीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२) दिली. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल याबाबत सभागृहात आणि मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय : धनंजय मुंडे

पिकांच्या ऐन मोसमात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली आहे. त्यामुळे उघड्यावर असलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले.

आदित्य ठाकरेंसाठी पवार मैदानात; चंद्रकांत पाटलांना म्हणाले....

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Determined to help farmer ajit pawar