esakal | मोठा गौप्यस्फोट : पहाटेच्या शपथविधीबद्दल स्वतः फडणवीस काय सांगतायत, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

मोठा गौप्यस्फोट : पहाटेच्या शपथविधीबद्दल स्वतः फडणवीस काय सांगतायत, वाचा...

महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलंय. फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलंय.

मोठा गौप्यस्फोट : पहाटेच्या शपथविधीबद्दल स्वतः फडणवीस काय सांगतायत, वाचा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यात आणि पुढे जे राजकीय नाट्य सुरु झालं ते केवळ महाराष्ट्र आणि देश नाही तर जगभरात पाहिलं गेलं. दररोजच्या पत्रकार परिषदा, आरोप प्रत्यारोप, एकेकाळच्या मित्रांमध्ये पडलेली उभी फूट आणि महाराष्ट्रात स्थापित झालेलं महाविकास आघाडीचं सरकार. सर्वच गोष्टी सर्वसामान्यांसाठी अनाकलनीय.

या सर्व सत्तानाट्यात मध्येच झाला एक मोठा भूकंप. हा भूकंप होता भल्यापहाटे ब्राह्ममुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची वेगळी नोंद निश्चितच राहील. 

मोठी बातमी - : अमित ठाकरेंची अजित पवारांसोबतची भेट यशस्वी, अजित पवारांनी घेतला 'मोठा' निर्णय...

यावर आता महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलंय. फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नव्हता. दरम्यान भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेचे सिग्नल मिळत होते असं फडणवीस म्हणालेत. नुसते सिग्नलच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादीत दोन बैठका देखील झाल्याचं फडणवीस म्हणालेत. यापैकी एका बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो तर एकाला उपस्थित नसल्याचा खुलासा फडणवीसांनी केला. या बैठकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने सोबत जायचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने घेतला होता असं देखील फडणवीस म्हणालेत.

मोठी बातमी - : मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असता तर १०० टक्के माझं आणि अजित पवार यांचं सरकार टिकलं असतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दरम्यान आपल्या हातातून सत्ता गेली हे दोन दिवस पटतच नव्हते याचाही उच्चार करायला फडणवीस विसरले नाहीत.

याबाबत बोलताना, खरंतर दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजतो एकत्र आले असते हेही फडणवीस म्हणालेत. मात्र त्यावेळीही राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले असते तरीही शिवसेनेला सोडायचे नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत आली नाही, असंही फडणवीस म्हाणालेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात INSIDER ला दिलेल्या जेष्ठ पत्रकार राजू परुळेकरांशी मुलाखतीत ते बोलत होते. 

devendra fadanavis on early morning oath taking ceremony with ajit pawar and politics of shivsena