Devendra Fadanvis: राज्यपालांवर देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? घेताहेत सावध भूमिका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis: राज्यपालांवर देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? घेताहेत सावध भूमिका?

Devendra Fadanvis Deputy chief minister reaction: राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी हे सध्या कमालीचे चर्चेत आहेत. तसे ते नेहमीच वेगवेगळया कारणासाठी लाईमलाईट असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती.

राज्यपाल यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त केला गेला. आज तर छत्रपती उदयन राजे भोसले यांनी तर राज्यपालांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्या वक्तव्याच्या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरी हे नेते उपस्थित होते. त्यांनी त्यावर का प्रतिक्रिया दिली नाही. असा प्रश्न केला होता. राज्यपाल यांनी ते वक्तव्य करण्यापूर्वी काहीच विचार केला नसेल का असेही उदयनराजे म्हणाले होते.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

यासगळ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिल्यावर आता सगळ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी देखील उदयनराजेंनी पंतप्रधानांना पत्र दिल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात पवार बोलल्यावर उद्धव ठाकरे यांना देखील बोलावे लागते. अशी खोचक टिप्पणीही फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा: Vikram Gokhale : 'उपचारांना प्रतिसाद नाही'! डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न, पत्नी वृषाली यांची माहिती

फडणवीसांना जेव्हा राज्यपाल यांच्या वक्तव्यावरुन विचारण्यात आले तेव्हा मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं. त्यामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी राज्यपाल यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे काही अपमान करण्याच्या उद्देशानं केललं नाही. अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. आताही फडणवीसांनी ठाम भूमिका न घेता राज्यपालांच्या प्रश्नांना दिली बगल नेटकऱ्यांच्या रागाचा विषय ठरताना दिसत आहे.

हेही वाचा: Sharad Pawar: आजारपणानंतर शरद पवार अ‍ॅक्शनमोडमध्ये; आखणार रणनिती