
राम चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्या : देवेंद्र फडणवीस
नाशिक : भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंग यांनी सबुरीने घेताना ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौराचे समर्थन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केले.
राज यांनी सरकारकडून अपेक्षा ठेवू नये - फडणवीस
नाशिक मध्ये गोदावरी सन्मान सोहळ्यानिमित्ताने आले असता माध्यमांशी ते बोलतं होते. भाजप खासदार सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करताना मोर्चा देखील काढला होता, त्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, खासदार सिंग हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध का करतं आहे. हे माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. परंतु श्रीराम चरणी जात असेल त्याला जाऊ द्याव. राज्य सरकार व मनसे मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, राज यांनी सरकारकडून अपेक्षा ठेवू नये, राज्य सरकारने मर्यादा सोडल्या आहेत. जे सरकार लांगूलचालन करत आहे. हनुमान चालिसा म्हणण्याचे फक्त घोषित केल्यानंतर खासदार, आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना बारा दिवसांसाठी जेलमध्ये ठेवले जाते, त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे.
हेही वाचा: Raj Thackeray | मनसे महिला पदाधिकाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा
राज्य सरकार विरोधात आम्ही लढत आहोत. राज ठाकरे यांनी देखील लढण्याचा सल्ला त्यांनी दिला. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मुंबईत कार्यालय सुरु करण्यात आल्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय सुरु केल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र पॉवरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा महाराष्ट्रावर काही एक परिणाम होणार नाही. महाराष्ट्रावर काही परिणाम झाल्यास महाविकास आघाडी सरकारमुळे होईल अशी टीका करताना जेल मधून काम करणाऱ्या मंत्र्यांच्या दुराचारामुळे राज्य सरकार संकटात येईल असा टोला लगावला.
उद्धव ठाकरेंना पवारांच्या सल्ल्याची गरज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका करताना देशाचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी केंद्र सरकारपेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं चांगलं होईल. महिला, बेरोजगार, बारा बलुतेदारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे पवारांनी राज्य सरकारला सल्ला द्यावा. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करतं आहे. चांगल्या कामामुळे नागरिक मोदींवर खूष असून चांगल्या कामाबद्दल विश्वास दाखविला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ला द्यावा, त्या सल्ल्याची गरज त्यांनाच अधिक आहे.
हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा फॉर्म्युला, एका घरात एकच पद
Web Title: Devendra Fadanvis On Raj Thackerays Ayodhya Daura And Brijbhushan Singh Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..